Friday, May 25, 2007

वळीव

आला वळीव वळीव, पडती पर्जन्याच्या धारा
वाहे खट्याळ समीर नभ वाजवी नगारा

वर्षाव अमृताचा मेघ करी धरणीवरी
भिजुनिया चिंब त्यात अवनी तृप्त होई खरी

दरवळे मृद्गंध चौफेर आसमंती अनिवार
जणु सुगंधाची कुपी विधाता उधळी सभोवार

या पहिल्या पावसाची ओढ सर्वांना अंतरी
होता आगमन त्याचे मन आनंदे झंकारी


-सौ. प्रतिमा उदय मनोहर