सप्त स्वर संगीताचे
भाव उकलती मनाचे
किमया या सात स्वरांची
निर्मिती होई नव रसांची
होता स्वरांचा झंकार
होई नादब्रह्म साकार
संगीताचे साकारणे
हे तो ईश्वराचे देणे
Saturday, November 17, 2007
Subscribe to:
Posts (Atom)
- सौ. प्रतिमा उदय मनोहर
नमस्कार.
माझ्या आईविषयी कुठून सुरवात करु? लिहिण्यासारखं बरंच आहे, पण जागा आणि शब्द अपुरे पडत आहेत. अनेक गुणदोषांनी युक्त असलेल्या गृहिणींसारखी असलेली माझी आई ही माझी "आई" आहे, हीच बाब माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. उत्तम गृहिणी असण्याबरोबरच ती सुगरणही आहे. विणकामादि कलाकौशल्याची तिला आवड आहे. योग व प्राणायामाचाही तिचा अभ्यास आहे. शिवाय ती उत्तम कविताही करते. तिला सुचलेल्या कविता व काही स्फुट लेखन इथे प्रकाशित करताना अत्यंत आनंद होतोय. आपल्यालाही या कविता आवडतील असा मला विश्वास आहे.
-प्रशांत उदय मनोहर