Sunday, September 30, 2007

चार ओळी

मुक्त मी स्वच्छंद मी
बेभान मी स्वप्नील मी
या अशा उन्मुक्ततेला
उत्स्फूर्त तुझी साथ ही


फुले पारिजात पानोपानी
शुभ्र सडा पडे अंगणी
जणू स्वागता उषेच्या
अंथरला शुभ्र गालिचा


पहाट गुलाबी थंडीची
वाट धुक्यात हरवली
होता भानूचा उदय
मिळे सृष्टीलाच ऊब


मळभ येतसे अंबरी
आकाश डहुळे अंतरी
वीज कडकडाट करी
पडती पावसाच्या सरी

2 comments:

आशा जोगळेकर said...

खरंच स्तुत्य उपक्रम आहे. मी पण तुमच्या सारखीच
माझा ब्लाग आहे झुळुक

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

नमस्कार आशाताई,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Page copy protected against web site content infringement by Copyscape