Saturday, November 17, 2007

नादब्रह्म

सप्त स्वर संगीताचे
भाव उकलती मनाचे
किमया या सात स्वरांची
निर्मिती होई नव रसांची

होता स्वरांचा झंकार
होई नादब्रह्म साकार
संगीताचे साकारणे
हे तो ईश्वराचे देणे

3 comments:

प्रशांत said...

प्रिय आई,
या कवितेबद्दल हार्दिक अभिनंदन.
-प्रशांत

आशा जोगळेकर said...

प्रतिमा ताई, सुंदर कविता.

संगीताचे साकारणे
हे तो ईश्वराचे देणे
सुंदर

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

आशाताई,
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या कविता फारच छान आहेत. आणि चित्रसुद्धा.
घरी इंटरनेट slow असल्यामुळे प्रतिसाद वाचायला आणि द्यायला जरा वेळ लागतो.
-सौ. प्रतिमा उदय मनोहर