Thursday, March 27, 2008

स्वप्न

स्वप्न म्हणजे काय असतं?
नकळत
सारं दिसत
सुप्त
मनाचा
मुक्तपणे
विहार असतो

स्वप्न म्हणजे सुप्त मनाने
जागेपणी
केलेले अवलोकन
अनेक
अतर्क्य अनाकलनीय
घटनांचे दृश्यांचे चिंतन

स्वप्न असते झोपेत फ़ुलणारे
जाग
येताच विरणारे
आभासालाही
खरे मानणारे
मनाला
नेहमीच गुंगविणारे

स्वप्नांची ही मालिका
दृश्य
दाखविते मनात
जागृती
येताच ती
अदृश्य
होते क्षणात

1 comment:

मोरपीस said...

स्वप्नाच अगदी नेमक्या शब्दात आपण वर्णन केलेले आहे