Wednesday, December 31, 2008

रम्य सकाळ

उगवला रविकर हा गगनी
उजळली सर्वांगी अवनी

आला आला खट्याळ वारा
सुगंधित करी परिसर सारा

कुणी शुभांगी गुणगुणत मनी
सडा घालते पहा अंगणी

रेखुनी सुंदर रंगावली
रंग भरुनी तिला सजवली

या अशा प्रसन्न वेळी
पाऊले हरीची दारी थबकली

2 comments:

Asha Joglekar said...

प्रतिमाताई खूप दिवसांनी आले ब्लॉग वर । सुंदर कविता भेटली । सकाळच अवतरली जणू . नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

आशाताई,
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे हल्ली ब्लॉगवरचं लेखन, वाचन फारच कमी झालंय. आज बर्‍याच दिवसांनी ब्लॉग उघडला आणि तुमचा अभिप्राय दिसला.

Page copy protected against web site content infringement by Copyscape