Sunday, November 10, 2013

इंद्रधनुष्य

तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे
नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा
पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे
हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत करी सर्वांचे
निळ्या निरभ्र आकाशी धनु दिसे मनोरम इंद्राचे
पारवा हा रंग अनोखा शोभे इंद्र धनुष्यात
जांभळ्याची गडद किनार उठुन दिसते सर्वात
सप्त रंगी या धनुने शोभा वाढविली या गगनात
पाहुनी हरखे मयुर मनी नर्तन करी आनंदात

1 comment:

Asha Joglekar said...

सुंदर। निसर्ग किती विविध रूपांनी आनंद देत असतो।
प्रतिमा ताी तुम्ही ब्लॉग वर आलात व कमेंट ही केलीत धन्यवाद। हल्ली प्रशांत मात्र नाही येत।

Page copy protected against web site content infringement by Copyscape