Saturday, December 1, 2007

स्त्री

स्त्री म्हणजे घराचे घरपण ही व्याख्या फार जुनी झाली. नुसत घरपण जपण हेच तिच कर्तव्य किंवा कर्तुत्व राहील नसून तिच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. पूर्वी तिच संपूर्ण जीवन नात्यांच्या बंधनात बांधलेल होत. जन्मत: ती मुलगी नंतर बहिण, पत्नी व नंतर मुलांची माता. या प्रत्येक नात्यात तिला अनेक बंधन आहेत पण तरीही ती सर्व बंधन स्वीकारुनही आजची स्त्री आपल्या हुशारीने, बुद्धीने व कार्याने आपले स्वतंत्र सन्माननीय स्थान जगात मिलावून दाखविते. स्त्री म्हणजे अनाकलनीय न उलगड्णार कोड आहे. ती भोळीभाबडी आहे तशीच चतूरही आहे. ती दवासारखी टवटवित हवेसारखी तरल आहे ती मनाने खंबीर आहे. तिच्यामुळेच घराच घरपण टिकतच पण त्याच बरोबार समाज टिकुन राहण्यास आवश्यक असलेले ऋणानुबंध ही तिच्याचमुळे द्रूढ होतात. एका नव्या जीवाला जन्म देण्याची क्षमता देवाने फक्त तिलाच बहाल केली आहे. ह्या नैसर्गिक देणगीने स्त्री ही जगातील सजीवात सर्वोच्च स्थानावर आहे म्हणूनच ती पूजनीय आहे. ती एका जिवालानूसता जन्म देत नाही तर त्याच पालनपोषण करून त्या जीवाला जगात माणुस म्हणुन जगण्यासाठी सक्षम करण्याचे मोठे कार्य ती सहजतेने करते स्त्रीच कार्यक्षेत्र आता विस्तारल आहे. मुलांच संगोपन, कुटुंबातील नातेसंबध जपणं वृध्दांची आजारी व्यक्तींची सेवा करणं,गरज असेल तर अर्थाजन करून पतील आर्थिक साथही ती देते हे सर्व करताना तिचं शारिरीक व आत्मिक दोन्ही बळ खर्च होत असतं पण ती हसतमुखाने सर्व आघाड्यांवर सतत काम करत असते.स्त्री भावनाप्रधान आहे म्हणुन बाळाला आई मिळते, सासुला चांगली सून मिळते पतीला चांगली सहचारिणी मिळते . समाजाच समृध्द रूप जगासमोर येत ती प्रत्येकच्या भावना जपण्याचा प्रयत्न करते वादविवाद,भांडण टाळण्याचा प्रयत्न करत असते तिच्या मनाचा समतोल चांगला साधला तर जिजाऊसारखी आदर्श माता जगासमोर येते तिच्या मनस्वीपणाचा अतिरेक झाला तर कैकेयीसारखी माता पहायला मिळते. क्षणात हसणारी, क्षणात रडणारी, थोड्या दु:खाने हळवी होणारी, कणखरपणे एखादा निर्णय घेणारी, अशी विविध रूप स्त्रीत दडलेली असतत. जगात सर्व काही माणूस मिळवू शकतो पण जन्मघेण्यसाथी एका स्त्रीची कुसच लागतेह्म्हणुनच स्त्रीला प्रथम वंदन करतात "मातृदेवोभव" स्त्री खरच एक अनाकलनीय व्यक्तीमत्व आहे

6 comments:

प्रशांत said...

आई,
आश्चर्याचा सुखद धक्का दिलास तू. लेख तर छान आहेच, पण आता तुला टाईप करण्याचीही चांगली सवय झाली याचा आनंद आहे. आता अधिकाधिक कविता आणि लेख टाकत रहा.
All the best!
-प्रशांत

Asha Joglekar said...

प्रतिमा ताई खिती सुंदर शब्दांत तुम्ही स्त्री ला उलगडून दाखवलंत. अतिशय सम्रर्पक लेख !

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

आशाताई,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
-सौ. प्रतिमा उदय मनोहर

TheKing said...

Agree with all the points but a woman is a human too. Nobody seems to be speaking about it.

HAREKRISHNAJI said...

खरय आपले म्हणणे.

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

theking व harekrishnaji,
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

Page copy protected against web site content infringement by Copyscape