आई असते घराचे जागतेपण
तिच्या वावरण्याचे नसते दडपण
शांतपणे देते ती सर्वांना मनोबळ
तिलाच सांगु शकतो आपण मनातील खळबळ
ती असते समईतील वात
मनोभावे रमते ती प्रपंचात
तिचे असणे धरले जाते नेहमी गृहीत
पण नसणे मात्र जाणवते मनाला सदोदित
Monday, December 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
प्रतिमा ताई, खूपच सुरेख कविता . आईचं इतकं समर्पक वर्णन प्रथमच वाचलं अन तेही कवितेत.
अभिनंदन !
धन्यवाद आशाताई.
Post a Comment