Tuesday, March 27, 2007

ऋतुचक्र

आला वसंत ऋतु आला
पानझडीचा काळ संपला
फुटे पालवी नव वृक्षावर
येई मोहोर आम्रतरूवर

ग्रीष्माची लागता चाहुल
तप्त होतसे सकल धरातल
ऋतु हा आम्रफलांचा
अन् शीतल पेयांचा

वर्षाऋतुच्या आगमनाने
सृष्टी मोहरे आनंदाने
पर्जन्याने येई गारवा
ऋतु हा सणांचा अन् उत्साहाचा

शरदऋतु हा मुख्य सणांचा
दसरा, कोजागिरी, दिवाळीचा
शरदाचे चांदणे शीतल
करी भाव मनांतिल तरल

आली हेमंताची स्वारी
देई थंडीची ललकारी
येता थंडीची लाट
धुके पसरे ग दाट

करी आगमन शिशिर
वाहे जोराने समीर
ऋतु हा पानझाडीचा
ऋतुचक्रातील ऋतु शेवटचा


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

2 comments:

HAREKRISHNAJI said...

मस्तच आहे हे ऋतुचक्र. काही वर्षापुर्वी मी वीणाताईंचा ऋतु दर्शन कार्यक्रम पाहिला होता त्याची आठवण झाली.

राग गौरीबसंत,

आज पेरीले गोरी रंग बंसतीचीरा, आय रितुराज, कोयलरिया कूके ॥ रंगादे रंगादे अरे रंगरेजरा,
आय रितुराज, कोयलरिया कूके ॥

तपन लागी ये धारा

करीम नाम तेरो

आई चांदनी रात शरद की

हेमंत हिमवंत समान

सरसरीत शिशीर समिर

प्रशांत said...

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यावाद.

-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Page copy protected against web site content infringement by Copyscape